Thursday, 10 March 2016

सोनुभाऊ बसवंत महाविद्यालयातील उल्लेखनीय कार्य
v इंटरनेट सुविधा :-
          महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना अद्यावत ज्ञान संपादन करता यावे याकरिता आपल्या महाविद्यालयामध्ये विद्यार्थ्यांकरिता इंटरनेट सुविधा सुरू करण्यात आलेली आहे. त्याचबरोबर आजच्या संगणक युगात आधुनिक तंत्रज्ञानाचा शिक्षणात जास्तीत – जास्त वापर करता यावा याकरिता सर्व प्राध्यापकांना लॅप-टॉप प्रदान करण्यात आलेले आहेत.
v डिजिटल क्लासरूम :-
           आपल्या महाविद्यालयात शिक्षण घेत असलेल्या सर्व विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळावे, त्यांची आकलन क्षमता वाढावी याकरिता महाविद्यालयातील सर्व क्लासरूम अत्याधुनिक तंत्रज्ञानाने सुसज्ज करण्यात आलेले आहेत. काही मोजक्या महाविद्यालयांमध्ये अश्या प्रकारची सुविधा उपलब्ध आहे . अश्या मोजक्या महाविद्यालयांमध्ये आपले महाविद्यालय आहे.
v सुसज्ज ग्रंथालय :-
           मुंबई विद्यापीठांतर्गत येणार्‍या काही मोजक्या महाविद्यालयांच्या सुसज्ज ग्रंथालयांपैकी आपल्या महाविद्यालयातील ग्रंथालय हे एक सुसज्ज ग्रंथालय आहे. या ग्रंथालयातील पुस्तकांची सर्व देवाण-घेवाण ही SOUL Software द्वारे होत असून OPAC, Web OPAC चा पुस्तके शोधण्यासाठी वापर करण्यात येत आहे. आपल्या ग्रंथालयात N-LIST Consortia द्वारे 6000 पेक्षा जास्त ऑनलाइन आंतर्राष्ट्रीय नियतकालिके आणि 90000 पेक्षा अधिक ई-बुक्स वाचकांसाठी उपलब्ध आहेत. थोर राष्ट्रपुरुषांची जयंती ग्रंथालयात साजरी करीत असताना संबंधित व्यक्तीवर आधारित पुस्तकांचे प्रदर्शन भरविण्यात येते.
v राष्ट्रीय सेवा योजना :-
           महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजनेच्या वतीने समाजोपयोगी अनेक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. त्याचबरोबर विद्यार्थांच्या व्यक्तिमत्व विकासाच्या दृष्टीकोनातून  राष्ट्रीय सेवा योजनेच्या वतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते.
v सी.सी.टीव्ही. कॅमेरे :-
          महाविद्यालय व महाविद्यालयातील परिसरात काही अनुचित प्रकार घडू नये याकरिता आपल्या महाविद्यालयातील सर्व परीसर, वर्गखोल्या, ग्रंथालय, परीक्षा विभाग व सर्व कार्यालयांमध्ये सी.सी.टीव्ही. कॅमेरे बसविण्यात आलेले आहेत.
v व्ही. एल. सी. सेंटर :-
          आपल्या महाविद्यालयात व्हर्च्युअल लर्निंग सेंटर असून त्याचा महाविद्यालयातील विद्यार्थांना खूप फायदा होत आहे. तसेच या सेंटरचा विविध शासकीय, सामाजिक, व शैक्षणिक संस्थांना फायदा होत आहे. ठाणे जिल्ह्यातील ग्रामीण भागात फक्त आपल्या महाविद्यालयात हा उपक्रम राबविला जातो.
v एक रुपयात प्रवेश योजना:-
          आपले महाविद्यालय एक नावीन्यपूर्ण उपक्रम राबवित असून गरजू आणि गरीब विद्यार्थ्यांना आपल्या महाविद्यालयात नाममात्र एक रुपयात प्रवेश दिला जातो. प्रत्येक वर्षी अनेक विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ होत असतो.
v रिसर्च सेंटर :- 
          आपल्या महाविद्यालयात डॉ. अनिलकुमार सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली हिन्दी संशोधन केंद्र कार्यरत असून त्यांच्या मार्गदर्शनाखाली पाच विद्यार्थी  विविध विषयांवर संशोधन करीत आहेत.
v एन.सी.सी. :-
          आपल्या महाविद्यालयात एन.सी.सी. यूनिट असून अनेक विद्यार्थी एन.सी.सी. यूनिट प्रशिक्षण  घेत असून त्याचा उपयोग त्यांना विविध विभागांमध्ये नोकरी मिळविण्यासाठी होत आहे.
v विद्यार्थिनी वसतिगृह :-
          आपल्या महाविद्यालयातील विद्यार्थिनी शिक्षण घेण्यासाठी दूरवरून येतात. केवळ अंतरामुळे विद्यार्थिंनींच्या शिक्षणात खंड पडू नये म्हणून महाविद्यालयाच्या परिसरात विद्यापीठ अनुदान आयोगाच्या सहकार्याने २४ खोल्यांचे प्रशस्त विद्यार्थिनी वसतिगृह बांधण्यात आलेले असून ७२ विद्यार्थिंनींची राहण्याची सोय झालेली आहे.
v प्राध्यापक वृंद :-

          आपल्या महाविद्यालयातील सर्व प्राध्यापकांची नेमणूक महाराष्ट्र शासन, मुंबई विद्यापीठ व विद्यापीठ अनुदान आयोगाच्या सर्व अतींचे पालन करून झालेली आहे.महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक पूर्ण पात्रता धारण केलेले असून अर्धवेळ प्राध्यापक देखील नेट/सेट परिक्षा उत्तीर्ण झालेले आहेत. १००% पात्रताधारक प्राध्यापक असणारे मुंबई विद्यापीठातील हे एकमेव महाविद्यालय होय.   

No comments:

Post a Comment

विचार मंथन ·                      एकता का किला सबसे सुरक्षित होता है। न वह टूटता है और न उसमें रहने वाला कभी दुखी होता है।      - अज्ञ...